मनातील सल
वेदनांच काहूर
चिघळलेली जखम
जीवाला लागलेले हुरहूर
असहाय्य झालं की
खरचं सांगतो तुला
हवं तितकं हवं तसं
काळजाच्या प्रत्येक
ठोक्यापासून व्यक्त हो
सरस्वती लेखणीच्या कृपेने
शब्दांच्या माळा
ओवत......!
सुख दुःख आनंद समाधान
प्रेम विरह जगणं मरणं
तुझ्या दारातील
कुणाच्या घरातील
फुलांसारख्या अक्षरांना
कागदावर सांडशील
तुझे विचार मांडशील
तुझं दुःख हलकं वाटेल
इत्तरांच दुःख बघून
तुझ्या मनगटात शक्ती आहे
व्यक्त होण्याची
लेखणीव्दारे......!
कवी प्रशांत गायकवाड
