ओळख
ओळखीच्या वाटेवर
ओळखीची माणसं भेटली
आणि ओळखीने
ओळख वाढत गेली
जसं जशी ओळख
जुनी झाली
तसं तशी ओळखीचीही
काही माणसं दूर झाली
नकळतपणे अनोळखी
असल्यासारखी
का माहीत नाही
उत्तर शोधतोय
एखाद्या पुस्तकात
वाचून वाचून बरीच
पुस्तके वाचली
निर्माण झालेल्या प्रश्नाचं
उत्तर नाही मिळालं
पण माणूस म्हणून
कसं जगायचं
कसं वागायचं
नक्कीच शिकायला मिळालं
माणसाला.
कवी प्रशांत गायकवाड
