माणूस म्हणूनच

माणूस म्हणूनच

का कळेनास झालंय
एकटेपणाची जाणीव
कशाला आपणच
आपल्यातील
काढावी उणीव......!

माणूस म्हणून जगू
मरताना माणूस
म्हणूनच मरू
जाता येईना घेऊन काही
एकमेकांना मदत करू......!

हिरव्या शिवारात कसं
शोभून दिसतंय कणसं
हल्ली ओळखता
येत नाही लवकर
माणसालाच माणसं......!

रडशील पडशील
पुन्हा घडशील
खचणार नाही
वाकला जरी
कर प्रयत्न नित्य तू
पहिला नेम
चुकला जरी......!

कवी प्रशांत गायकवाड
Previous Post Next Post