नाती

नाती

व्हायला हवे असेही
कुणी सोडून गेल्यावर
वेदना होणार नाहीत
आसवांना गाळल्यावर

जुळल्यावरी तुटती
धागेच ते असतात
गरज संपल्यावर
मागेच ते असतात

माणूस म्हणून जगुनी
घेऊ माणूसपणाचा निरोप
प्रामाणिक पाखरावर
खोटी पाखरंच लावती आरोप

चार खांदे दहा माणसं
गर्दी रडणाऱ्यांची मावत नाही
पूर्वी फाटलेल्या वस्त्रासारखी
कुणी नाती शिवत नाही

कैक पूर कैक कचरा
बरेच नदी सोसते ना
खळखळाट रात दिन
तरी नदी हसते ना

कवी प्रशांत गायकवाड
Previous Post Next Post