काळजातली जखम

काळजातली जखम

जमिनीवरील पाय कसे 
आभाळाला भिडले
का त्याच्या आयुष्यात 
नकळत असे घडले

शिकविली तलवार ज्याला
जिंकला तो अन् मीच मानली हार
फिरविल्यावर पाठ जेव्हा
म्हणे चुकून झाला वार

तूच तर म्हणत होतास
आपलेच सारे आहेत
कुठे इथे तर कुणी नाही
क्षणभंगुरही वारे आहेत

जखम चिघळावी म्हणून
खपलीवरही चोळले मीठ
कर्मावरून कळते आता
जात्यातून पडणारे पीठ

तसं असेल तसं नसेल
किंवा असावं कदाचित
पण कसंय ना माणसाला माणूस
जोडण्याची असावीच रीत

कवी प्रशांत गायकवाड
Previous Post Next Post