सूर

सूर

नजरेत नजर घेऊन
चुकवू नको नजर तू
भेटीत पहिल्या वहिल्या
लवकर हो हजर तू

टाळून टाळल्यावर
जीवात जीव नाही
पुन्हा जवळ कशाला
मग सोडलेय जर तू

ठोक्यात प्रत्येकी अन्
नावही तुझेच आहे
गावावरून गेल्यावर
गीत मी होतेस सूर तू

कवी प्रशांत गायकवाड
Previous Post Next Post