तुला माहित नाही का
सावरलेल्या वाटेवर
आवरलेल्या मनाचा
पुन्हा पसारा होईल
पुन्हा आवर यालाच तर
आयुष्य म्हणतात
तुला माहीत नाही का ?
कधी मंद येईल वारा
कधी तुफान वादळ
हवासाही वाटेल
नकोसाही वाटेल
यालाच तर निसर्ग म्हणतात
तुला माहित नाही का ?
रुसशील तू पण सुध्दा
फसशिल फसवतील बरेच
चालावं लागतं सोबत
बसावं लागतं एकटं
यालाच माणूस म्हणतात
तुला माहित नाही का ?
कवी प्रशांत गायकवाड
