निःशब्द तरीही तुझे मायबाप
माणसाने तर ठरवलंय
म्हणे माणुसकी शून्य
पैसा हवाय फक्त आता
बाकी काहीच नाही मान्य...
भाळतो आहे लोळतो तो
धन दौलतिच्या गादीवर
धाडतो वृद्धाश्रमात मायबाप
जणू विकून खातो रद्दिवर...
सगळ्याच गोष्टी होउद्याना
पण आईवडील का होती जड
खूपच दिली शिकवण त्यांनी
असे नाही तू असेच लढ...
कसलाच विचार नव्हे त्यांचा
लगेच वेगळं त्यांना देतात
झालो बाबा मोकळं एकदाचा
असं स्वतःलाच म्हणतात...
माझं लेकरू माझंच बाळ
तरी माया का तोडतो
हात देण्या ऐवजी
साथ अर्ध्यावरच सोडतो.
कवी प्रशांत गायकवाड
