दिवाळी

दिवाळी

काढून रांगोळी दारा पुढती
दिवाळी साजरी करूयात

भेटी गाठी साऱ्यांच्याच
वसा माणुसकीचा धरुयात

सडा शिंपूनी अंगणात
पेटवूयात दीप ज्योत

मदतीचे हात लावू एकमेका
देऊयात आपण साथ

कवी प्रशांत गायकवाड


Previous Post Next Post