जीवनाची सांजवेळ
इथे राख होते आयुष्याची अन्
जन्मभर पैशावर भाळतो माणूस
सोडूनिया श्वास घेतो जगाचा निरोप
दोन सांडून आसवे मग कळतो माणूस
सुखात आनंदी दुःखाला सामोरे
आहे तो भित्रा जो पळतो माणूस
होतेय एकदा जीवनाची सांजवेळ
विसरून उपकार जळतो माणूस
गुणांना महत्व नाहियच हल्ली
चेहऱ्यावर फक्त भाळतो माणूस
सकारात्मक ठेव नकारात्मक नको
नेहमी चांगल्या गोष्टींना टाळतो माणूस
कवी प्रशांत गायकवाड
