सूर्योदय.....
रात्रभर डोळ्याला डोळा
न लागल्यावर
घड्याळाची वाजणारी टिकटिक
माणसाला मागचं पुढचं सारंच
आठवायला लावते......!
तसं तुझं माझं
म्हणणं काही नाहीय
भविष्याची चिंता असुदे
आणि असावीच
मग भूतकाळातल्या घटनांचा
दृश्य डोळ्यांसमोर आणून
का स्वतःला त्रास करून घेतोस......!
बरंच काही विचार करून झाल्यावर
जरासा डोळा लागला
अन् थोड्याच वेळात
सूर्योदय झाला
तुलाही माहीत आहे
सूर्योदय होणार आहे
तनमनाला खच्चीकरण
करून जीवनात
सूर्यास्त होणार नाही
इतकंच तुला आवर्जून
सांगायचं आहे........!
कवी प्रशांत गायकवाड
