*माऊली*
शिंपडूनी घाम
उगविते *पीक*
जगाला पोसतो
माणूसच *एक*
डोक्यावर मोळी
झाली *सांजवेळ*
मायबापासाठी
ओवे शब्द *माळ*
हातात बांगड्या
करती *आवाज*
कपाळाला कुंकू
शोभतोया *साज*
येईल येणार
जीवाला *मरण*
पकडून ठेव
माऊली *चरण*
गोठ्यात वासरू
चाटतेय *गाय*
निरंतर प्रेम
करतेय *माय*
नसाविच भीती
आला जरी *ताप*
काळजी अखंड
म्हणतात *बाप*
आनंदी आसवे
गळून *जातात*
पिकाला पाहून
गाणी *सुचतात*
तालावर ताल
झुलतेय *शेत*
हर्षित दिवस
शांत जाई *रात*
आईचा पदर
बापाची *साऊली*
प्रत्येक्ष देवता
आपुली *माऊली*
गोंजारते जेव्हा
तिच्या *लेकराला*
आठवे पाऊस
माझिया *मनाला*
कवी प्रशांत गायकवाड
