समाधान
माणुसकीला टाळणे
आणि पैशावर भाळणे
हल्ली हेच जमतंय
माणसाला...
सुगंधित फुले जशी
आकर्षित करतात
तशीच काही माणसे
माणसाला मोहात पाडतात
सहज ठेवून जातो विश्वास
अन् नकळत न घडणाऱ्याही
गोष्टी घडून जातात जीवनात......!
त्यांचं तर सोड जाऊदे
तू हसतांना स्वतःला
आरश्यात पाहा
तुझ्या गालावरची खळी
खूपच भारी वाटते
अशा ना छोट्या छोट्या गोष्टीत
आनंद मानत जा
मी दुःखात सुध्दा
समाधानी आहे
असं कधी तरी
म्हणत जा......!
कवी प्रशांत गायकवाड
