वादळ
मनात घुटमळणाऱ्या वादळाला
ओठांवर आलेल्या शब्दांना
कुण्या जवळील व्यक्तीपाशी
व्यक्त व्हायचं असतं
होऊन झाल्यावर
चौका चौकात त्या दुःखाचा
बाजार मांडला जाणार नाही
याची व्यक्त होणाऱ्या
व्यक्तीला काळजी वाटते
म्हणूनच ओठांवर
आलेले शब्द बऱ्याचवेळा
ओठांतच दुमडून राहतात
आतल्या आत......!
फुलातील मकरंद संपल्यावर
फुलपाखरू उडून जातं
फक्त कामाशी काम झाल्यावर
म्हणे माणूसही सोडून जातं
आणि आयुष्याची
वजाबाकी सुरू होते
बेरीज मात्र मोजकी असते
पण खरंच भारी असते
चांगल्या माणसांच्या येण्याने......!
प्रामाणिक माणसं ही
सुगंधित फुलांसारखीच असतात
त्यांना कुणीही तोडलं
तरीही गंध दरवळतोच ना
हात आणि साथ सोडली म्हणून
कैक किलोमीटर चाललेला रस्ता
पुन्हा मागे बघून पुन्हा येऊ नये
जे होणार ते होणारच
पण तेवढा रस्ता पार करणारच
कारण जीवन तुझं आहे
मग जगायला आणि
न भिता वागायला
तुलाच लागेल
हो...ना....
कवी प्रशांत गायकवाड
