तळमळणारं पाखरू
बसमध्ये बसून
कानात इअरफोन घालून
गाणे ऐकत खिडकीबाहेर
पळणाऱ्या झाडांकडे बघतांना
तुझाच भास होतो
तू जवळ असल्यासारखा
पण जवळ नसतेस
प्रत्येक्षात.....!
प्रवास संपतो
आठवणी लांबतात
स्वप्नातही तूच
मनातही तूच
तू सोडून सारेच
अस्थाव्यस्त होते
मग घालमेल
होऊन जाते मनाची
नजरही एकटक
न्याहाळत बसते
आरश्यात स्वतःला
स्वतःच्या डोळ्यात
आलेले पाण्याचे
थेंब पुसत......!
तुझ्या प्रितवेड्या
पाखराच्या काळजावर
तुझं कोरलेलं नाव
खोडता येईल
काचेवानी हृदयालाही
तोडता येईल फोडता येईल
स्मशाना जवळ जाईपर्यंत
तुझ्या आठवणी
पिछा सोडणार नाहीत
याचं काय ?
तू विचार केलाय का कधी
तळमळणाऱ्या
पाखराचा......!
कवी प्रशांत गायकवाड
