आत्महत्या
आत्महत्या करणं खूप सोपं आहे. सहसा वाईट गोष्टी लवकरात लवकर करता येतात किंवा होतात.पण चांगल्या गोष्टींना फार उशीर लागतो.
आयुष्य म्हटलं म्हणजे संकट येणारच त्या संकटांसोबत लढलं पाहिजे थोडं घडलं पाहिजे.
न लढता मानलेली हार आत्महत्या करण्यापेक्षाही वाईटच नाही का ?
असं मला तरी वाटतंय.आपल्यामध्ये किती ताकद आहे,आपण किती प्रयत्न करू शकतो त्या दुःखाला सामोरं कसं जाऊ शकतो यासाठी आपल्यावर दुःखाचं डोंगर कोसळतं.म्हणूनच जिंकणार तर तूच आहेस फक्त आत्महत्या करण्यापेक्षा पुन्हा उठ पुन्हा नव्याने अजून एकदा संकटांशी लढ आणि स्वतःच म्हण स्वतःला मी खंबीर आहे.
मात्र मनाला कोसळू देऊ नकोस इतकंच तुला आवर्जून सांगायचं आहे
कवी प्रशांत गायकवाड
