लालपरी
कैक भेटले प्रवासी
मात्र अनोळखीच सारे
झेलतोय अंगावरती
थंडीतले गार वारे
ध्यैर्य गाठावयास
पोहचविते लालपरी
समजून घ्या तिला
हळहळ असलेली तिच्या उरी
तडफडतो जीव कधीचा
तळमळ मांडतांना खरी
बघतात वाट सांजवेळी
परतून येण्यास घरी
ऐकुन घ्या त्यांचे तुम्ही
त्यांना जाणून घ्या आता तरी
स्वप्न वाटेवरती पोहोचविण्यास
आहोत एसटी महामंडळाचे आभारी
कवी प्रशांत गायकवाड
