पण खरंच त्यातले नसतात सगळे

पण खरंच त्यातले नसतात सगळे

इतभर कपडे 
अंगावर चढवून
पुरुषाच्या नजरेला 
दोष देऊन 
प्रत्येक पुरुष 
नसतो सारखाच
फक्त शरीरावर
भाळलेला......!

तिच्यात शोधलेले गुण
आवडलेला स्वभाव
म्हणून काहींचा
अडकलेला असतो जीव
त्यांनी मात्र 
वाईटांच्या लिस्टमध्ये 
नाव नोंदवून 
मोकळं व्हायचं
पण खरंच त्यातले
नसतात सगळे
नुसते तिच्या देहावर
प्रेम करणारे......!

कवी प्रशांत गायकवाड
Previous Post Next Post