माय माऊली
पीक डोलते झुलते
माळरानात वनात
हर्षितांचा यो कल्लोळ
कसा उठला मनात
कांदा भाकरीचा घास
दिला खाऊन ढेकर
राब राबतोय बाप
शेतामंदी मर मर
जुना सदरा शिऊन
अंगावर चढवितो
बावरले जरी मन
लेकरांना घडवितो
भाजताना ही भाकरी
कैक चटके बसले
कष्ट बरेच करुनी
माय माऊली दिसले
कवी प्रशांत गायकवाड