त्यालाही वाटतंय तिने

त्यालाही वाटतंय तिने

कसं सांगावं तुला
सांगता येत नाही
जसा तुझ्यावर मी
कविता करतोय
तशाच काही ओळी
फक्त दोन किंवा चार तरी
लिहीत जा तू तुझ्यावर
रोज लीहणाऱ्या तुझ्या
प्रियकरावर......!

त्यालाही वाटतंय तिने
माझ्यावर लिहावे दोन शब्द
पाणावलेल्या डोळ्यांसोबत
कुठे तरी होऊन जाईल स्तब्ध
प्रत्येक वेळी नाही पण
कधी कधी बराच होतो उशीर
तो मात्र वाट बघून बघून
कसा होऊन जातो
व्याकूळ
हरण मृगजळाच्या मागे धावतो
पाण्याचा भास झाल्या सारखा
अगदी तसाच तोही
तळमळतो......!

फोन हातात घेतल्यावर
गाणे लावतो गाणे ऐकताना
का असे वाटते की
आपण दोघे जवळ असल्यासारखे
हातात हात घेऊन
पावसात जणू
चिंब जातोय न्हाऊन
सांग तुलाही असे
होत असेल ना
तुझ्या प्रितवेड्या
प्रियकराला
झाल्यासारखे......!

कवी प्रशांत गायकवाड
Previous Post Next Post