सांगा माणसाने माणसावर
ज्या फुलांनी ज्यांचा समजलला मळा
नकळत त्यांनी त्यांचाच कापला गळा
समज खोटा माझा माझीच माणसे सारी
भाळून मी लगेच चुकून लागला लळा
नाही तसा विचार मनात कधी आला
शिकवली तलवार त्यानेच उचलला विळा
ठेवले मी अतूट घट्ट नाते त्याचाशी
माझ्याच शिकारीस तो होऊन गेला बगळा
सांगा माणसाने माणसावर कसा ठेवावा विश्वास
माणूस जात एक मात्र माणसाचा रंग वेगळा
तोंडावरी असा की मधाळ गोड वाणी
धनदौलतीला भाळलेला बाजार नुसता सगळा.
कवी प्रशांत गायकवाड
कवी प्रशांत गायकवाड
