शेतात राबतो अन्
घामाने भिजल्यावर पिकतात दोन दाने
कष्टात राब राबून खिशात चार आने
तळमळ फार होते उन्हात राबताना
व्यथा बळीराजाची काय माहित कोण जाने
साऱ्याच या जगाला पोसावया निघाला
पाडून एकटे त्याला गायलीत गाणे
आली आता दिवाळी बाळास काय घेऊ
कपडे नवे नवे अन् फटाके घेऊन दे म्हणे
नदी वाहत होती नयनात आसवांची
त्याच्या विना कसे रे समदेच वाटते सुने
कवी प्रशांत गायकवाड
