प्रिय...तुझी आठवण

 प्रिय...तुझी आठवण


तिने दिलेल्या प्रत्येक आठवणी
मी तिला परत केल्या
अगदी वॉच सुध्दा
पण तिची आठवण तिला
परत करता आली नाही
याचीच खंत वाटते मनाला.....!

साऱ्याच गोष्टी टाळतो मी
बऱ्याच टाळता येतात मला
तिची आठवण टाळणे
कठीण फार होतेय का ?
चुकून भेट झाल्यावर
नजरेत नजर घेतल्यावर
नजर कशी असेल दोघांची
माहीत नाही.....!

मी अलगद हाताने
माझ्या सुखाची ओंजळ
तिच्या आयुष्यात सांडेन
इतकं मी आवर्जून सांगतो आहे
असेल कदाचित नसेल तिचा मी
तरीही तिच्यासाठी
अनेक कविता लिहितो आहे.....!

कवी प्रशांत गायकवाड

Previous Post Next Post