जिवंतपणी
आठवणी उरल्यावर
तू हळहळतोस ना जेव्हा
तेव्हा स्मशानात देह
धळधळ पेटत असतो
तू मात्र भूतकाळात
घालवलेले क्षण
नजरे समोर आणून
पाणावलेले डोळे पुसत
असतोस ना ते दाटून
आलेले कंठ फुटता फुटत नाहीत
आतल्या आत जीव
गुदमरून जातो
गर्दीत हरवल्या सारखा
अन् जागे होते मन
मी त्याला समजून का
घेतले नाही
जिवंतपणी......!
कवी प्रशांत गायकवाड
