ललित लेखन

ललित लेखन

यात्रेत माणसांची गर्दी व्हावी तशीच कधी कधी मनात विचारांची गर्दी होत असते.अन् तोच एकांत स्वतःला,स्वतःच्या जिवाला विसरायला सुध्दा भाग पाडत असतो.राहत नाही माणसाला देहभान कसलेही,होऊन जाते सारेच अस्था व्यस्थ,अस्वस्थ.विचार करणे जेवढी चांगली गोष्ट आहे तेवढीच अतिविचारणे घातक ठरू शकते.

आपल्या मनाची भावनांची कुणी समजूत काढत नसेल तर आपणच आपल्या मनाची समजूत काढून चालत राहावे पुढे. शेवटी या स्वार्थी जगात कुणी कुणाचं नसतं. गरजे पुरता वेळ काढणे,अन् गरज संपल्यावर नकळत निघून जाणे.हल्ली हेच सुरू आहे. स्वाभिमान असावा प्रत्येकाला हा खूप महत्त्वाचा आहे .आणि याच स्व मधला अभिमान जेव्हा आपण पूर्णपणे कुण्या व्यक्तीला देऊन बसतो तेव्हा फक्त स्व उरतो.कधी काळी स्व... ही कायमचा हरवून बसतो.
म्हणूनच स्वाभिमान मधला स्व कधीच हरवून बसणार नाही याची काळजी घ्यावी प्रत्येक व्यक्तीने.

असुदे तुला तुझा स्वाभिमान तुझा अभिमान.

कवी प्रशांत गायकवाड
Previous Post Next Post