संवाद साधताना

बोलायचे ठरवले बोलून फार झाले
संवाद साधताना नकळत वार झाले

भेटीत भेट झाली भेटीत रंगलो जेव्हा
प्रितीतले आपल्या बंद दार झाले

रुसला असेल चंद्र न बोलताच काही
लपवूनिया स्वतःला दाट अंधार झाले

सांगू किती नवे मी जुनेच साठलेले
सुगंधी फुलांचे ओवून हार झाले

नाही नको कशाला हातात हात नंतर
प्रेमातल्या संगीताचे छेडून स्वर झाले

उभा असेल शांत तुझा प्रियकर प्रशांत
नाही अजून नाही मना मनांचे सार झाले

कवी प्रशांत गायकवाड
Previous Post Next Post