चारोळ्या
बहुतेक तिलाही
राग आला असावा
तिला काय माहित ती
रागात छान दिसते...
वाटेत भेटलो तेव्हा
पाऊस फार झाला
न बोलताच काही
काळजावरी वार झाला...
डोळे मिटल्या नंतर आपण
हातात हात घेतले होते
तो दिवस कधी सरला
दोघांना कळालेच नाही...
निघते आता उशीर होतो
गजरा माळायचा राहून गेला
रंग गुलाबी ओठांवरचा
अत्तर सुगंधी घेऊन गेला
कवी प्रशांत गायकवाड
