समजून घ्यायला हवं
कसा आहेस म्हणत
सगळं काही ठीक आहे
मस्त अगदी छान आहे
आनंदाचे रान आहे
म्हणून झाल्यावर
अस्वस्थ वाटलं जरा
असंख्य वाहताना झरा
मनातल्या मनात कोलमडून
का मनाला झाकावं
आपणच आपल्यासाठी
आपल्याला उभं राखावं
शेवटी आपणच आपलं असावं
थोडं आरश्यात पाहून हसावं
रुसता आलं तर रुसावं
रुसवा निरंतर नको मात्र
आज सोबत असू
माहीत नाही उद्या
असेल शेवटाची रात्र
इतकंच की माणसाने माणसाला
समजून घ्यायला हवं
नातं जोडताना नवं
ते जुनं असलं तरी
चालता यावी सुख दुःखासवे
जीवनाची वारी
जगताना......!
कवी प्रशांत गायकवाड
9325683645
