ऐकना प्रिया
ऐकना तुलाही
आठवत असेल
मला तर आठवतेच
आपली पहिली भेट
बाईक वरून दोघे
निघाल्यावर
तेवढ्यातच जोरात
पाऊस आलेला
तू तुझ्या लाल दुपट्ट्याने
तुझं अंग झाकत
एका मोठ्या झाडाच्या
आधाराने त्या खाली
लपल्यावर तू
हातावर हात घासत
थंडी घालवत होतीस......!
माझ्या अंगातील मी
जॅकेट लगेचच काढून
तुझ्या अंगावर ठेवत
तुला घालायला लावला
जराशी थंडी वाजायची
कमी झाली म्हणे
पण वाजतच होती
तुला कसं सांगू रे मी
की मला तुझ्या
उबदार मिठीची
गरज आहे
तुला नाही वाटलं का
मला घट्ट मिठी
मारावी म्हणून......!
हळु हळु पावसाचा
वेग कमी झाला
दोघांच्याही ओठांतून
शब्द निघेना
जायचं का आता
निघायला हवं
उशीर होत आहे
एकमेकांमध्य इतकं
धुंद झाल्यावर
गारव्यात कवेत
घेतल्यावर
सरत चाललेला
दिवसही न सरत
चालल्या सारखाच
भासत होता........!
मी तर नाहीच नाही
तूच म्हणलीस
अरे सांजवेळ होत आहे
निघुयात ना रे
तसा शब्द काही
नाही निघाला
तिला आवडणाऱ्या
माझ्या ओठांतून
मी फक्त हम्म...म्हणत
पुढे निघालो
बाईक स्टार्ट केली
अन् तू मला
घट्ट मिठी मारलीस
तेव्हा माझं प्रेम
तुझ्यावरच अधिक वाढत
चाललं होतं
पण तुला त्या क्षणी
सांगू शकत नव्हतो
कारण दोन ही प्रेम पाखरांना
घरट्याकडे परतायला
उशीर झाल्यामुळे
म्हटलं सांगून टाकू
पुन्हा कधी तरी
पुढच्या भेटीत.......!
कवी प्रशांत गायकवाड
