जरासा स्तब्ध
सूर्य मावळतीला चालला
सांजवेळ होत होती
दुरून एक वाऱ्याची गार लहुर
तुझ्या भरगच्च आठवणींना
माझ्या जवळ घेऊन येत होती
त्या झुळुकेचा स्पर्श
अंगाला झोंबल्यावर
मी सारे विसरून गेलो
तिथल्या तिथेच
जरासा स्तब्ध झालो
तेव्हा फक्त त्या क्षणी
मनाला तुझीच
आठवण आली होती
बऱ्याच आठवणी
कवेत घेतल्या
रात्र सरली
डोळ्याला डोळा
लागला नाही
पुन्हा नव्याने
पहिल्यासारखा
दिवस उगवला
कदाचित तुलाही
असे होत असेल ना......!
कवी प्रशांत गायकवाड
