कैक धाडले प्रेम पत्र
ओठांना ओठ त्याचे
जुळवून बघ ओठांवर
तो तर फिदा आहे
तुझ्या उडणाऱ्या बटांवर
हातात हात घेतल्यावर
घट्ट मिठी मार त्याला
अपार प्रेम तुजवरी
सखये कसे सांगू तुला
सांगायचे होते की
जाताना जातेय मी आता
पुढच्या भेटीत सारेच काही
खोट्याच तुझ्या बाता
दिस सरला रात्र झाली
आठवण साथ सोडेना
कैक धाडले प्रेम पत्र
अजून भेट घडेना
काळजीपायी प्रियकर
राग व्यक्त करतोच ना
प्रेम केले प्रेमात पडले
जिंवत असून माणूस मरतोच ना
कवी प्रशांत गायकवाड
