बाबा

बाबा

बाबा गावी गेले म्हणून
मी खाऊच्या आशेने
दरवाजाच्या दिशेने
बाबांची वाट बघत होतो
माझ्यासाठी आणलेला
खाऊचा पुडा मी
परत परत मागत होतो
तो आनंद ते क्षण
इतक्या सहजतेने
मांडता येणार नाहीत
आभाळा एवढं
स्मित खुलायच चेहऱ्यावर
चेहरा फुलून दिसायचा
आरश्यात न पाहत सुध्दा.

कवी प्रशांत गायकवाड
Previous Post Next Post