शहर

शहरात सगळ्याच गोष्टी
जरी उपलब्ध असल्या
आणि खेड्यात बऱ्याच गोष्टी
उपलब्ध नसल्या तरी
खेड्यात माणुसकी नक्कीच
उपलब्ध आहे
कसंय ना शहरात
दाराला दार असून
भाड्याने का होईना
स्वतःच्या बालकनीत बसून
घरासमोर आपल्या दारासमोर
कोण राहतं माहीत नाही......!

प्रशांत गायकवाड
Previous Post Next Post