कदाचित
तुझ्या आठवणीने
दिवसाची सुरुवात व्हावी
अन् तुझ्याच आठवणीने
दिवस सरावा
कदाचित तू माझ्यावर
प्रेम केले म्हणून की
मी तुझ्यावर प्रेम केले म्हणून
याचं उत्तर हवं होतं
मला तुझ्याकडून
पण नको जाऊदे
नाही कळणार तुला
तू तुझीच बाजू घेशील
म्हणशील मीच
प्रेम करतेय असं......!
कवी प्रशांत गायकवाड